पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ फेब्रुवारीला बेळगाव दौऱ्यावर येत आहेत . यावेळी नरेंद्र मोदी यांचा भव्य असा रोड शो होणार आहे . हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरेल असे विधान परिषद सदस्य केशवमूर्ती यांनी सांगितले .
बेळगाव शहरात पंतप्रधान मोदी यांचा रोड शो होणार असल्याने भाजप तसेच या जनतेमध्ये चैतन्य पसरले आहे . मोदीजींच्या आगमनाच्या तयारीसंदर्भात माहिती देताना विधान परिषद सदस्य केशवमूर्ती यांनी सांगितले कि , पंतप्रधान मोदी बेळगाव शहरात आयोजित विविध लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . भव्यदिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमात लाभार्थी तसेच मोदीजींचे चाहते प्रचंड प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे . कार्यकर्त्यांमध्ये देखील या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे . राज्यसरकार तसेच पंतप्रधान कार्यालयातून रोड शो साठी परवानगी मिळाली आहे . बेळगावचे आ .अभय पाटील , आ . अनिल बेनके तसेच भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील या कार्यक्रमाची तयारी करीत आहेत . बेळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य यासाठी लाभत आहे . आ . अभय पाटील हे , ह्या रोड शोचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आयोजन करणार आहेत . कर्नाटकातील हा रोड शो पंतप्रधांसाठी अविस्मरणीय असा ठरेल . ते म्हणाले .

तर या रोड शोबद्दल सांगताना आ . अभय पाटील म्हणाले कि , या रोड शो साठी तीन ते चर मार्ग आम्ही ठरवले आहेत . पोलीस अधीक्षक ज्या मार्गाला अनुमती देतील त्या मार्गावर रोड शो होणार आहे . रोड शो दरम्यान राज्य आणि देशाची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडेल . याबद्दल त्यांनी अधिक सांगण्याचे टाळले . मात्र हा रोड शो अतिशय भव्य दिव्य असा होईल त्याचप्रमाणे किसान सन्मान योजना , जलजीवन मिशन , हॉस्पिटल्स , त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधानाच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती आ . अभय पाटील यांनी दिली .
एकंदर पंतप्रधान मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याची आणि रोड शोची जय्यत तयारी सुरु झाली असून , भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हाये .


Recent Comments