Accident

ट्रकची दुचाकीला धडक : दोघे ठार

Share

विजापूर जिल्ह्यातील बसवणबागेवाडी शहराच्या बस डेपोजवळ एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

एकाच दुचाकीवरून चार जण काम आटोपून घरी जात असताना मागून आलेल्या एका लॉरीने त्यांना धडक दिल्याने शिवू आणि सद्दाम यांचा मृत्यू झाला. अन्य दोघे जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. हा अपघात बसवणबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला .

Tags: