येत्या पंधरा दिवसात आगामी विधानसभा निवडणुकीची काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल असे काँग्रेस प्रदेश प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सांगितले .
बेळगाव शहरातील काँग्रेस भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना माहिती देत होते . ते म्हणाले कि , काँग्रेस राज्यातील सर्व क्षेत्रात आपले उमेदवार उभे करणार असून , येत्या पंधरा दिवसात , उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल . त्याचप्रमाणे , राज्यातील शहरापासून ,प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन , काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी , गृह ज्योती योजना तसेच गृहलक्ष्मी योज़नेची माहिती देणार आहेत .
पुढील दहा दिवस हा कार्यक्रम चालणार आहे . आम्ही जाहीर केलेल्या योजनेमुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे . आणि यामुळेच अश्वत्थ नारायण यांनी सिध्दरामय्यांना मारण्याचे वक्तव्य केले . भाजपाला ही निवडणूक आपण हरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे . आपल्या रक्ताची कुर्बानी देण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे . त्यामुळे ही योजना कोणत्याही कारणाने बंद पडणार नाही असे सुरजेवाला म्हणाले .
भाजप सरकार २०० कोटीत आमदार खरेदी करते , तर काँग्रेस पारदर्शकपणे पक्षासाठी फंड गोळा करीत आहे . बोम्मई सरकार हे ४० % कमिशनचे सरकार आहे असा पुन्हा उल्लेख करीत त्यांनी भाजपवर आरोप केला.


Recent Comments