Belagavi

येळ्ळूर येथे अकरावे मराठी साहित्य संमेलन

Share

येळ्ळूर गावाला जशी साहित्य संमेलनाची परंपरा आहे त्याप्रमाणेच संघर्षाची धार आहे . मराठी भाषेवरील अन्यायात हे गाव सक्रिय नेतृत्व करते , असे उदघाटक सुधीर चव्हाण यांनी सांगितले .

येळ्ळूर येथील अकराव्या साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ते व्यासपीठावरून बोलत होते . ते म्हणाले कि , येळ्ळूर आणि बेळगावची ओळख साहित्य संमेलनाचे गाव म्हणून झाली आहे . अनेक संमेलने मोठ्या उत्साहात आणि लोकवर्गणीतून आयोजित केली जातात . त्यामध्ये वेगळेपण आणि वैशिष्ट्य जपणारे सर्वात मोठे संमेलन म्हणून या संमेलनाचा उल्लेख करावा लागेल .

या . साहित्य सम्मेलनांना अनेक नामवंत लेखक , साहित्यिक अध्यक्षपदी लाभले आहेत . शिवाय चित्रपट कलावंत देखील या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य ठरते . येळ्ळूर गावाला जशी साहित्य संमेलनाची परंपरा आहे त्याप्रमाणेच संघर्षाची धार आहे . मराठी भाषेवरील अन्यायात हे गाव सक्रिय नेतृत्व करते. गोवा स्वातंत्र्य चळवळ , स्वातंत्र्य लढा , साराबंदी आंदोलनात हे गाव अग्रेसर होते . सीमाभागातील मराठी भाषा , संस्कृती जोपासण्यासाठी इथे साहित्य संमेलन साजरे केले जाते . मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल असे ते म्हणाले .

तर रावजी पाटील आपल्या भाषणात मराठी साहित्य संमेलन हा चळवळीचा भाग आहे हे सर्वाना मान्य करावे लागेल असे म्हणाले . आम्हाला नव्या सूर्याची ओळख होईपर्यंत लढा लढत राहूया . आमच्यासोबत साहित्याची शिदोरी सर्वाना जगण्याचे धैर्य देईल हा विश्वास उरी बाळगूया असे ते म्हणाले .

प्रारंभी वाद्यघोषामध्ये गावातील प्रमुख मार्गावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली . यावेळी छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला .
यावेळी विविध शिक्षण , साहित्य , सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

Tags: