न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य विमा कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने महेश फाऊंडेशनच्या उत्कर्षा लर्निंग सेंटरमध्ये शिक्षण घेत असलेल्या वंचित मुलांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सीएसआर उपक्रमांतर्गत 35 सीटर स्कूल बससह महेश फाऊंडेशनला प्रदान केली आहे. यावेळी महेश फाऊंडेशनच्या आवारात स्कूल बस हस्तांतर समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीच्या हुबळी च्या प्रादेशिक कार्यालयाचे उप महाव्यवस्थापक प्रकाश एम रेवणकर, यांनी त्यांचा अनुभव सांगितला आणि म्हणाले, “महेश फाऊंडेशन या संस्थेने वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आम्हाला महेश फाऊंडेशन सोबत एका चांगल्या कार्याचा भाग होता आलं याचा आनंद होत आहे आणि मी येत्या काही दिवसांत आमच्या तर्फे अजून सहकार्याची खात्री देतो”. तसेच त्यांनी मुलांना कठोर परिश्रम, अधिक स्पर्धात्मक आणि सर्व क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याच्या सूचना दिल्या.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्यालय मुंबईत आहे, ही सरकारच्या मालकीची प्रीमियर बहुराष्ट्रीय सामान्य विमा कंपनी आहे जी जगभरातील 28 राष्ट्रांमध्ये कार्यरत आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स 103 वर्षांहून अधिक काळ नॉन-लाइफ इन्शुरन्स सेगमेंटमध्ये अग्रणी आहे. भारतातील 2395 कार्यालयांचे विद्यमान नेटवर्क असलेले हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अग्रगण्य जागतिक विमा गटांपैकी एक आहे.
या प्रसंगी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी, प्रादेशिक कार्यालय, हुबळी चे प्रादेशिक व्यवस्थापक, आर. सुरेश बाबू यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि ते म्हणाले, “न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला या भागात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी महेश फाऊंडेशनचे अभिनंदन करतो आणि आम्ही गरजूंना मदत करण्यासाठी तिथे आहोत.” त्यांनी एनआयए मध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला आणि प्रत्येकाला इतरांना मदत करण्याचे सुचवले.

सीआरएस उपक्रमांतर्गत, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडने स्कूल बसचे प्रदान केले ज्याचा फायदा उत्कर्षा लर्निंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या 275+ वंचित मुलांना होईल. ही मुले दूरवरच्या ठिकाणी राहत असल्याने शाळा ते घर अंतर सुरक्षित वाहतुकीचे करण्याचे महेश फाऊंडेशनसमोर आव्हान होते.
द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडचे आभार व्यक्त करताना महेश फाऊंडेशनचे संस्थापक . महेश जाधव म्हणाले, “न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड ही पहिली सरकारी संस्था आहे जी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आली आहे. आम्ही न्यू इंडिया अश्युरन्सचे त्यांच्या बहुमोल समर्थनाबद्दल आभारी आहोत. ही स्कूल बस मुलांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करेल आणि असुरक्षित समुदायातील मुलांना या सुविधेचा फायदा होईल. येत्या काही दिवसांत ५०० मुलांना शिक्षण देण्याचे आमचे ध्येय आहे.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी, प्रादेशिक कार्यालय, हुबळी चे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रकाश एम रेवणकर, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी, प्रादेशिक कार्यालय, हुबळी चे प्रादेशिक व्यवस्थापक, आर. सुरेश बाबू , वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुरेश कुमार बी. एस., सहाय्यक व्यवस्थापक आणि प्रभारी, टिळकवाडी मायक्रो ऑफिस, एनआयए, बेळगावचे रतन पी. रामगोंडा, बिझनेस असोसिएट, एनआयए विभागीय कार्यालय, बेळगावचे व्ही जी जोशी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी महेश फाउंडेशनची मुले, समर्थक, कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते.


Recent Comments