महाशिवरात्री निमित्त श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवानिमित्त, 17, 18 व 19 फेब्रुवारी असे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागनुर रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू महास्वामी यांनी दिली.
बेळगाव पोलीस मुख्यालयाच्या वतीने श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे . यावेळी या जत्रा महोत्सवाचा शुभारंभ करून बोलताना स्वामीजी म्हणाले कि , एरव्ही पोलीस आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असतात . मात्र या जत्रा महोत्सवाच्या निमित्ताने , त्यांना थोडा विरंगुळा मिळत आहे . जत्रेचा एक भाग म्हणून रांगोळी स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहे . पोलिस पथकाकडून नाटक सादर केले जाणार आहे . त्याचप्रमाणे मुलांसाठी नृत्य व गायन स्पर्धा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी , पोलीस विभागातील अधिकारी डी.ए.आर., एस.पी श्रीनिवास यादव, सी.पी. सी.ए. आर.सिद्धनगौडा पाटील, ए.एस.वरद , आर.पी.आय.एम.एस.दुरोल, सदाशिव धनंजेकर , नागराज पाटील, बसवराज चेन्नमन्नावर, महादेव मठदेवरा, पायनगौडा बा. पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments