गोकाक येथील खून झालेल्या व्यावसायिकाचा मृतदेह अखेर सहा दिवसांच्या शोध कार्यानंतर , पंचनायकनहट्टीजवळील कालव्यात सापडला.

गोकाकमधील डॉक्टरला दिलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज परत मागितल्याने , गोकाकमधील व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती . सहा दिवसांनंतर या व्यावसायिकाचा मृतदेह पंचनायकनहट्टीजवळील कालव्यात सापडला.
व्यापारी राजू झंवर यांचा भोसकून खून करून आरोपींनी त्याचा मृतदेह कोळवीजवळ घटप्रभा नदीच्या उजव्या तीरावर असलेल्या कालव्यात फेकून दिला होता.
पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि मच्छिमारांचे पथक गेले सहा दिवस मृतदेहाचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री ज्याठिकाणी मृतदेह टाकण्यात आला तिथून आठ किमी अंतरावर राजूचा मृतदेह आढळून आला.
व्यापारी राजू झंवर हे 10 फेब्रुवारी रोजी गोकाक येथून बेपत्ता झाले होते. गोकाक नगर येथील सिटी हॉस्पिटलजवळ राजू झंवर यांची दुचाकी आढळून आली. 11 फेब्रुवारी रोजी गोकाक शहर पोलीस ठाण्यात व्यापारी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. व्यापारी राजू झंवर यांना शेवटचा फोन करणाऱ्या व्यक्तीला फोन करून चौकशी करण्यात आली. राजू झंवर बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर डॉ.सचिन शिरगावी यांचा शेवटचा फोन आला होता . संशयाची सुई या डॉक्टरभोवतीच फिरत होती आणि पोलिसांनी डॉ.सचिन शिरगावी यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली.
त्यावेळी , डॉक्टर सचिनने , राजू झंवरचा खून करून कालव्यात फेकल्याची कबुली दिली होती .
पोलीस, अग्निशामक पथक तसेच मच्छीमारांचे पथक गेले सहा दिवस मृतदेहाचा शोध घेत होते . अखेर सहा दिवसांनी गोकाक तालुक्यातील पंचनायकनहट्टीजवळील कालव्यात आढळून आला . बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . संजीव पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन, शोधकार्यासाठी विशेष पथके नियुक्त केली होती .
या प्रकरणातील संबंधित आरोपीना अटक करण्यात आली असून , हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे .


Recent Comments