Vijayapura

स्वतःची किडनी दान करून आजीने नातवाचा वाचवला जीव

Share

यशोदा रुग्णालयाचे डॉक्टर रवींद्र मद्राकी यांनी सांगितले की, पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे.

विजापूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गेल्या 18 वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या 21 वर्षीय युवकाला , 74 वर्षीय आजीने तिची एक किडनी दान केली . त्यानंतर आम्ही ती किडनी प्रत्यारोपित केली . बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी येथील आजी आणि नातू सचिन या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता स्थिर आहेत .. सचिनची आजी तिची एक किडनी दान करण्यासाठी पुढे आली तेव्हा रुग्णालयाचे डॉक्टर रवींद्र मद्रकी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपण केले. आता आजी आणि नातू निरोगी आहेत.

रुग्णालयाच्या वतीने , ह्या आजी आणि नातवाचा सत्कार करून , त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

Tags: