बेकायदेशीर दुसरा विवाह करून , पहिल्या पत्नीला मारहाण करून पळून गेलेल्या पतीला महिला पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी ,बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे .
याबाबत माहिती अशी कि , बेळगाव शहरातील हनुमान नगर येथील रहिवासी असलेल्या तबस्सुम इनामदार या महिलेने , तिचा पती महम्मद असिफ इनामदार यांच्याविरोधात ,महिला पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे . पती महम्मद इनामदार याने आपल्याला मारहाण केली तसेच त्याने आपण दुसरे लग्न केले असून, आपल्याला घरातून निघून जाण्यास सांगितले .
तबस्सुम तसेच तिच्या कुटुंबीयांनी या विरोधात बेळगाव महिला पोलीस स्थानकात महम्मद इनामदार याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे .
पोलिसांनी महम्मद इनामदार याच्या विरोधात , भारतीय दंड विधान कलम 498 /ए , 323 , 504 , 506 , 417 , 494 , 447, उपकलम 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे .


Recent Comments