Belagavi

बेळगावात इमारतीवरून पडल्याने युवक गंभीर जखमी

Share

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगावात घडली आहे.

जिल्हा इस्पितळाशेजारील डॉ. आंबेडकर मार्गावरील युके-27 समोरील इमारतीवरून पडल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. त्याने तीन मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या युवकाचे नाव समजू शकलेले नाही.

एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरु आहे. सखोल तपासाअंतीच या घटनेचे नेमके कारण समजू शकणार आहे.

Tags: