Belagavi

कल्याणस्वामी मठात सद्गुरु श्री नित्यानंद स्वामींचा सप्ताह

Share

बेळगावातील कल्याणनगर, वडगाव येथील श्री कल्याणस्वामी मठात सद्गुरु श्री नित्यानंद स्वामींचा सप्ताह कार्यक्रम पार पडला. गोकाक येथील कल्लोळी गावचे श्री कलमेश्वर स्वामी यांचे “कैवल्य पद्यम्” या विषयावर प्रवचन झाले.

चिक्कमुनवळ्ळी गावातील आरूढ मठाचे श्री शिवपुत्र महास्वामी यांनी “गुरुंचे महत्त्व” आणि “गुरूपरंपरा” या विषयावर प्रवचन दिले. श्री मठात बडेकोळ्ळ मठाच्या श्री नागय्या स्वामींची पाद्य पूजा करण्यात आली. यावेळी पारिशवाड कलमठ येथील वेदमूर्ती गुरुसिद्धय्या स्वामी यांचे प्रवचन झाले. मुर्कीभावी हिरेमठच्या स्वामींचे दिव्य सानिध्य लाभले.

सद्गुरु श्री नित्यानंद यांचा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. नंतर भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. वडगाव, खासबाग, जुने बेळगाव, देवांग नगर, लक्ष्मीनगर, मलप्रभा नगर, विविध गावातील भाविकांनी श्री कल्याण स्वामी मठात येऊन श्री मठाचा आशीर्वाद घेतला. याबाबत श्रीनिवास ताळूकर यांनी अधिक माहिती दिली.

महेश सारंगमठ, शिव बसू तिगडी, केदारी सोनटक्की, दशरथ दुंबडेकर, इराप्पा सोनटक्की, विजय काशी, सुरेश ढवळी, महेश कडेमनी, प्रकाश शिरोळकर, नित्यानंद मळ्ळी, कार्तिक ताळूकर, बाळू होगाडे आदींनी सद्गुरू नित्यानंद स्वामींचा सप्ताह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Tags: