कर्नाटक राज्य ब्राम्हण विकास महामंडळाकडून , विश्वामित्र प्रतिभा पुरस्कार वितरण आणि साधकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .
बेळगावमधील , भाग्यनगर दुसरा क्रॉस येथे सिटी हॉल मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन , कर्नाटक राज्य ब्राम्हण विकास महामंडळाचे , एच एस सच्चीदानंद यांनी केले . ते म्हणाले कि, गेल्या ७० वर्षात ब्राम्हण समाजाचा जो विकास झाला नाही तो गेल्या २ वर्षात झाला आहे . ब्राम्हण समाजात राज्यात फक्त १ % इतकेच आय ए एस तसेच आय पी एस अधिकारी आहेत . ते वाढवण्याची गरज आहेत . त्या दृष्टीने पावले उचलू .
यावेळी नगरसेविका वाणी जोशी , वसंत नाडजोशी , जगदीश हुनगुंद , जगन्नाथ कुलकर्णी , वत्सला नागेश , प्रिया पुराणिक , गोविंद फडके , आर एस मुतालिक, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती आणि इतर उपस्थित होते .


Recent Comments