Belagavi

बेळगावमध्ये ओपन स्टेट रोलर स्केटिंग स्पर्धा

Share

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन तसेच बेळगाव रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने , स्केटिंगचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने , ओपन रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले .

बेळगावमधील जुन्या पी बी रोड वरील , येडियुरप्पा मार्गावर आयोजित केलेल्या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील 5 ते 17 वर्षे वयोगटातील स्केटिंगपटू सहभागी झाले होते . या स्पर्धेविषयी माहिती देताना इंदूधारा सीताराम तसेच बेळगाव रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी या स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले कि , कर्नाटक रोलर स्केटिंगच्या वतीने बेळगावमध्ये ओपन स्टेट रोलर स्केटिंग स्पर्धा आयोजित केली आहे .

या स्पर्धेत बेळगाव सहित , मैसूर, बेंगळूर , दावणगेरे, गुलबर्गा , हुबळी , धारवाड , कोप्पळ , आदी ठिकाणाहून आलेले विविध वयोगटातील सुमारे 250 हुन अधिक स्केटिंग पटू सहभागी झाले आहेत . विजेत्यांना आकर्षक पदके आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत .
यावेळी स्केटिंग स्पर्धा पार पडल्या .विद्यार्थ्यांच्या विविध वयोगटात स्पर्धा घेण्यात आल्या .

यावेळी , स्केटिंगपटूंचे पालक ,तसेच आयोजक , आणि स्केटिंग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते .

Tags: