Belagavi

क्रीडा उपक्रमांसाठी करणार सतत सहकार्य : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील युवक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यायाम व क्रीडा साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, त्याचा लाभ सर्व गावांना टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कर्ले गावातील श्री. रवळनाथ स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
आजकाल तरूण आणि लहान मुले मैदानी खेळ खेळताना दिसणे दुर्मिळ झाले आहे. मैदानी खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रकारच्या क्रीडा उपक्रमांना सहकार्य केले जात आहे असे आ. हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक शंकर गोवेकर, विनायक पाटील, गणपत सांबरेकर, स्नेहल लोहार, रंजना बाष्कळ, जयवंत पाटील, अमृत खेमनाळकर, प्रकाश शेळके, विनायक पाटील, सागर गोवेकर, विजय पाटील, रवळू शेळके आदी उपस्थित होते.

Tags: