बेळगावातील वॅक्सीन डेपो मैदानावर , खडक गल्ली आयोजित श्री ट्रॉफीच्या सेमी फायनल मधील एस आर एस हिंदुस्थान विरुद्ध साईराज वॉरियर्स यांच्या दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यात , आंतरराष्ट्रीय क्रिकेटला साजेशी कॅच पकडून , किरण तरळेकर बेळगावातील क्रिकेटप्रेमींच्या गळयातील ताईत बनला आहे .
वॅक्सीन डेपो मैदानावर , खडक गल्ली आयोजीत श्री ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरु आहे . या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यमध्ये , किरण तरळेकर याने बाउंड्रीवर अप्रतिम असा झेल घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले . त्याचा हा झेल घेतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे .

तर या क्रिकेट मधील सर्वात महत्वाचे आकर्षण ठरत आहे ते म्हणजे डान्सिंग अंपायर .. क्रिकेट सामन्यात पंचाची भूमिका सर्वात महत्वाची असते . मात्र या सामन्यासाठी खास महाराष्ट्रातील बारामतीतील पंच “डॅनी सकट ” यांना आमंत्रित करण्यात आले आहे . या स्पर्धेचा अंतिम सामना अल रझा आणि साईराज वॉरियर्स या दोन संघात होणार आहे . वॅक्सीन डेपो येथे होणाऱ्या या सामन्यात डॅनी सकट यांची खास अदाकारी पाहायला मिळणार आहे . आपली विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध असलेले डॅनी सकट हे डान्स आणि खास हातवारे करीत क्रिकेटचे निर्णय देतात .
क्रिकेट समालोचक युवराज जाधव यांनी खडक गल्ली आयोजित श्री चषक स्पर्धेची माहिती दिली .
एकंदर किरण तारळेकर याने घेतलेला आकर्षक झेल आणि सामन्यासाठी उपस्थित राहणारे बारामतीचे डान्सिंग अम्पायर डॅनी सकट यांच्यामुळे श्री चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा गाजत आहे .


Recent Comments