Belagavi

जिल्ह्यातील 18 मतदारसंघात राष्ट्रवादी लढवणार निवडणूक

Share

पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी ही माहिती दिली.

बेळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ जाधव म्हणाले की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार येत्या विधानसभा कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकात अधिकाधिक उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पक्षाने यापूर्वीही जिल्ह्यातील तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. त्यावेळी पक्षाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येत्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी पक्षातर्फे निवडणूक लढवायची इच्छा असल्यास त्यांना पक्षाशी संपर्क साधता येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, चिटणीस दुर्गेश गोविंद मेत्री उपस्थित होते.

Tags: