शुक्रवारी सायंकाळी अपहरण झालेल्या गोकाकच्या प्रसिद्ध व्यावसायिकाचा खून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

गोकाक शहरातील प्रसिद्ध व्यापारी राजू उर्फ मुन्ना झंवर हे शहरातील सिटी हेल्थ केअरचे डॉक्टर सचिन शिरगावी यांची शुक्रवारी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास भेट घेतल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यानंतर
त्यांचा मोबाईलही बंद होता. राजू झंवर यांच्या कुटुंबीयांनी याबाबत गोकाक शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, राजू यांची कोळवी कालव्यात टाकून हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. सिटी हेल्थ केअरसमोर त्यांनी त्यांची दुचाकी उभी केल्याचेही समोर आले आहे. राजू आणि डॉ. सचिन शिरगावी यांचे व्यावसायिक संबंध सुरू झाले. पुढे त्याचा कोट्यवधींच्या व्यवसायात विस्तार झाला. अलीकडच्या काही दिवसांपासून दोघांमधील मतभेद व नाराजी वाढून ती हत्येपर्यंत गेल्याचे बोलले जात आहे.
गोकाक पोलिसांना दोन दिवसांपासून सर्व सूत्रांकडून माहिती मिळत आहे. आता कालव्याचे पाणी अडवण्यात आले असून पोलिस राजू यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण गोकाक शहरात एकच खळबळ उडाली असून हा जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.


Recent Comments