जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करत हिंदू जनजागृती समितीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने दर मिनिटाला एक बलात्काराची घटना घडत आहे. महिलांवर होणाऱ्या बलात्कारावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करणे थांबवणे आणि भारतीय परंपरेचे दिवस साजरे करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात जनजागृती मोहीम राबवून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पर्याय म्हणून १४ फेब्रुवारीला मातृ-पितृपूजा दिन साजरा करण्याचे नियोजन आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये अनुचित कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करावी, शाळांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करू देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली
या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .


Recent Comments