बेळगावची ऍपटेक एव्हिएशन अकादमी बेळगावच्या विद्यार्थ्यांना उंच भरारी घेऊन आपले भविष्य उज्वल बनवण्याची संधी देत आहे . याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे बेळगाव फ्लाईन्ग स्कुलचे इन्स्ट्रक्टर कॅप्टन बसवराज यांनी सांगितले ,
बेळगावच्या ऍपटेक एव्हिएशन अकादमीच्या वतीने एअरपोर्ट व एअरक्राफ्ट मॉडेल प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध मॉडेल्स या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, कॅप्टन बसवराज आणि बेळगाव एव्हिएशन्स चे कुमारस्वामी उपस्थित होते .
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी एअर टर्मिनल , ७७७ बोईन्ग प्लेन, न्यू मोपा गोवा एअरपोर्ट , तसेच एअरबस ची मॉडेल्स तयार केली होती .
विद्यार्थ्यांनी यावेळी आपण तयार केलेल्या मॉडेल्स बद्दल माहिती दिली . या मॉडेल्सची पाहणी करून निमंत्रित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले .

यावेळी बोलताना कॅप्टन बसवराज यांनी , विद्यार्थ्यांनी जे आज प्रोजेक्ट सादर केले , ते या संस्थेतून देण्यात आलेल्या उत्तम प्रशिक्षणामुळेच शक्य आहे . या अकादमीद्वारे बेळगावमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फारच चांगले प्रशिक्षण दिले जात आहे . सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .
यावेळी कुमारस्वामी सांगितले कि , आज अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत . परंतु एव्हिएशनसारख्या क्षेत्रात देखील अनेक संधी उपलब्ध आहेत . त्यात तुम्ही आपले करिअर करू शकता . आज विद्यार्थ्यांनी जे मॉडेल्स सादर केले त्यावरून या संस्थेचा शिक्षणाचा दर्जा किती उच्च आहे हे दिसून येते .
ऍपटेक चे विनोद बामणे , सरस्वती इंफोटेकच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती बामणे , किरण तोंडले , प्रकाश पाटील यावेळी उपस्थित होते .


Recent Comments