Vijayapura

विजापुरात आढळला ट्रिंकेट प्रजातीचा साप

Share

विजापूर शहरातील गँग बौडी येथील एका घरात ट्रिंकेट प्रजातीचा साप आढळून आला.

हे साप नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. दुर्मिळ असे हे बिनविषारी ट्रिंकेट प्रजातीचे साप उंदीर आणि बेडूक खातात . हे सहसा शेतात आढळतात. त्यांच्या दंशाने सहसा काहीही होत नाही. विजापूर शहरातील गँग बौडी येथील निवृत्त सहाय्यक आयुक्त एस.वाय. होसमनी . यांच्या घराच्या आवारात हा साप आढळून आला . एस.वाय. होसमनी यांचा मुलगा नागराज याने पत्रकार विजयकुमार सारवाड यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, आणि त्यांनी सर्प पकडणारा कल्लू याच्याशी संपर्क साधला. कल्लू याने त्याचा गँग बौडीमध्ये असलेला आणखी एक मित्र, मदुकू कांबळे याच्या मदतीने सापाला पकडून , सुखरूप जंगलात सोडून दिले .

हा साप आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून साप दिसणेही दुर्मिळ झाले आहे. सर्प पकडणारे मदुकू कांबळे यांनी सांगितले की, हा साप चुकून या ठिकाणी आला असावा . आम्ही घराभोवती तपासणी केली मात्र मादी साप कुठेच आढळला नाही

Tags: