Belagavi

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला व्यासपीठाची भेट

Share

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावातील शाळेतून 2003-04 मध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेवरील प्रेमाखातर 75 हजार रुपये खर्चून व्यासपीठाची उभारणी करून दिली आहे.

या शाळेतून शिकलेले माजी विध्यार्थी आज जीवनात अनेक ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नुकताच माजी विध्यार्थी मेळावा घेतला. या निमित्त शाळेच्या उपकारांची अल्पशी परतफेड करण्याच्या हेतूने त्यांनी 75 हजार रुपये खर्चून उभारणी केलेल्या व्यासपीठाची भेट शाळेला दिली.

यावेळी माजी मुख्याध्यापक श्रीमती. एस. के. परसन्नवर, श्रीमती. एस. एस. सेरेप्पन्नवर, ए. ए. बुड्डेभाई, श्रीमती. ए. एस. गनिकोप्प, श्रीमती. आर. एम. ठेगी, एस. जी. बगली, श्रीमती. आर. एफ. सुंकद, श्रीमती. जी. आर. इटगी, ग्रामपंचायत अध्यक्षा रेणुका एम. करविनकोप्प आणि कन्नड शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही. बडिगेर, एसडीएमसी अध्यक्ष इरफान कुडची आणि शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

Tags: