Vijayapura

भूकंपग्रस्त तुर्की आणि सिरीयात अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन

Share

भूकंपग्रस्त तुर्की आणि सीरियामध्ये कोणी अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईक हेल्पलाइन 080 -1070, 080-22340676 किंवा seockarataka@gmail.com या मेलवर संपर्क साधावा असे आवाहन विजापूरचे जिल्हाधिकारी विजय महांतेश दानंमन्नावर यांनी केले आहे .

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या जोरदार भूकंपात विजापूर जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी विजापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधल्यास जिल्हा प्रशासन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नोडल ऑफिसरची नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पावले उचलली जातील, अशी माहिती विजापूरःचे जिल्हाधिकारी विजय महांतेश दानंमन्नावर यांनी दिली आहे.

या संदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली की, सोमवारी झालेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाशी कणी संपर्क साधला नाही.
ही २४/७ सेवा असून तुर्की आणि सीरियामध्ये कोणी अडकले असल्यास त्यांचे नातेवाईक हेल्पलाइन हेल्पलाइन 080 -1070, 080-22340676 किंवा seockarataka@gmail.com या मेलवर संपर्क साधू शकतात.

Tags: