बेळगाव शहर व परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्या परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. बेळगाव शहरातील व्हॅक्सिन डेपो, बळ्ळारी नाला परिसरासह खानापुरातील नदी परिसरात हे पक्षी आढळून येत आहेत. या परदेशी पक्ष्यांचे फोटो टिपण्यात पक्षीप्रेमी सरसावले आहेत.
व्हॉइस ओव्हर : बेळगाव परिसरातील नदी व नाला परिसरात डिसेंबर ते मार्च महिन्यात मुबलक पाणी असते. या काळात पाण्याची पातळी हळूहळू कमी होते. यामुळे या पक्ष्यांना चांगले खाद्य मिळते. यामुळे या दरम्यान हे पक्षी बेळगावात वास्तव्यास येतात. साधारण मार्चच्या शेवटपर्यंत हे पक्षी या ठिकाणी वास्तव्य करणार आहेत. पक्षीप्रेमी येथे भटकंती करताना दिसत आहेत. लांब पायाचे पक्षीही तिबेट हिमालय परिसर, दक्षिण येथून येथे दाखल झाले आहेत हे पक्षी सागरी भागातून , गोवा आदी भागांतून बेळगाव परिसरात दाखल झाले आहेत.

यंदा आशियाई ओपनबिल स्टॉर्क, ब्लॅक हेडेड इंवॉस, स्पुन बिल, रोडोशेल डक, स्ट्रॉबेरी मुनिया, सौगल, बार हेडेड गुज, पेंटेड स्टॉर्क, ब्लॅक हेडेड क्रेन, ब्लॅक स्टॉर्क, स्मॉल प्रेन्टिकोल, पिन टेल डक, स्क्ली बेस्टेड मुनिया, व्हॉईंट डॉटिट मुनिया, स्टॉल्थ सॅन्ड पायपर, ब्लॅक हेडेड स्पील्ट, ग्रीन बीईटर, ब्राऊन कड पिकर आदी प्रकारातील पक्षी बेळगावात आढळत आहेत .
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध जातींचे पक्षी बेळगावात दाखल झाले आहेत. ओरिएंटल हॉर्नबिल, विस्टलिंग डक्स, रोजी मिनीवेट हे नवे पक्षी आले आहेत. अन्य जातींचे पक्षीही आहेत. त्यांचे छायाचित्र टिपत आहे. व्हॅक्सिन डेपो, बळ्ळारी नाला परिसरासह खानापुरातील नदी परिसरात हे पक्षी आढळून येत आहेत.


Recent Comments