महिन्याभरापूर्वी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले वडगाव आदर्शनगर राम कॉलनी येथील रहिवासी, नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.
9 जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमीसमोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना, नागेश कुसाणे यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते.
दरम्यान आज सकाळी नागेश यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे वहिनी, तीन पुतण्या असा परिवार आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वीच नागेश यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. आठवडाभरात घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्यामुळे कुसाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागेश यांच्या निधनाची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी. कुसाणे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी होणार आहेत. सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी रक्षा विसर्जन होणार आहे.


Recent Comments