खवय्याना साद घालणारी , कृष्णा काठावर पिकणारी रुचकर वांगी , चक्क मार्कंडेय काठावर पिकवण्यात आली आहेत. कडोलीच्या माळावर पीक बहरले आहे. येथील शेतकरी सहदेव फडके यांनी अनोखा प्रयोग राबविला आहे.
सहदेव फडके यांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचा ध्यास घेतला. वेगवेगळ्या पिकांची माहिती घेण्यासाठी कृषी संशोधन केंद्रांना भेटी दिल्या. जाणकारांकडून माहिती जमा केली. त्यानंतर गावातील एका शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेऊन त्यामध्ये कृष्णा काठची कसदार वांग्याची रोपे लावली आहेत. पीक सध्या बहरले असून फळधारणा सुरू झाली आहे.
कृष्णा काठावर भिलवडी परिसरात पिकणारी वांगी सर्वत्र रुचकर म्हणून ओळखली जातात. त्यांना ग्राहकांकडून पसंती मिळते. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत मलचींग अंथरले. ३८०० रोपे लावण्यात •आली असून ती सध्या ६० दिवसांची आहेत. लागवड सुरू झाली असून ९० दिवसांपर्यंत तोडणी सुरू राहणार आहे. यासाठी कूपनलिकेचे पाणी वापरण्यात येत असून त्याला केवळ १ इंच पाणी आहे. त्याचा ठिबकच्या सहाय्याने वापर केला जातो. आपल्या या शेतीतील वेगळ्या आणि यशस्वी प्रयोगाची माहिती सहदेव फडके यांनी आपली मराठीला दिली .शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचा मला छंद आहे. कमी पाण्यावर करण्यात येणाऱ्या शेतीची पाहणी करून दोन वर्षांपासून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे. मागील वर्षी भेंडी पीक घेण्यात आले. यावर्षी वांग्याचे पीक घेतले आहे. असे त्यांनी सांगितले .
पत्नी, आई व स्वतः सहदेव फडके शेतात राबतात. पिकाच्या गरजेनुसार पाणी व इतर कामे केली जातात. बेळगाव परिसरात कृष्णा काठची वांगी पहिल्यांदाच करण्यात आल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे. पिकाला बाजारात चांगली मागणी असून ग्राहक थेट संपर्क साधत आहेत. इतर वांग्यापेक्षा चांगला दर मिळत असल्याने अधिक नफा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे


Recent Comments