Belagavi

गुजराती ज्येष्ठ नागरिकांच्या हॅप्पी ग्रुपतर्फे गोपूजन

Share

बेळगावातील समस्त गुजराती समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हॅप्पी ग्रुपतर्फे भगवान महावीर गोशाळेमध्ये गोपूजेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रथम गोपूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर गोमातेला कोकीळाबेन ठक्कर, शीतलबेन सुतारीया, स्नेहलबेेन शाह, मीनाबेन पारेख व प्रवीणाबेन सुतारीया यांनी साडीचोळी अर्पण करून औक्षण केले. त्यानंतर गोशाळेतील 170 गायींना लाडु, चारा खाऊ घालण्यात आला. यावेळी हॅप्पी ग्रुपच्या वतीने महावीर गोशाळेला 15 हजार रुपये देणगी देण्यात आली.

या वेळी गोशाळेचे संचालक मनोज संचेती हॅप्पी ग्रुपचे अघ्यक्ष कनुभाई ठक्कर, ललितभाई शाह, किरणकुमार मेहता,किशोरभाई शाह, प्रवीणभाई शाह, अतुलभाइ शाह, रमेशभाई, चीनुभाई, अशोकभाई ठक्कर , रंजनबेन मोदी, उज्ज्वला मेहता, नीलमबेन, जयाबेन व अन्य बंधु, भगिनीनी या पवित्र कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी गोशाळेचा कर्मचारी वर्ग व सर्वासाठी जेवणाची व्यव्स्था करण्यात आली होती.

Tags: