रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप गोकाक काँग्रेसचे तिकीट इच्छुक उमेदवार अशोक पुजारी यांनी केला आहे .
व्हॉइस ओव्हर : बेळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले कि , रमेश जारकीहोळी यांना एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देणे भाग पडले आहे.
नुकतीच माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद घेतली होती .लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हर्षा साखर कारखान्यात काळा पैसा गुंतवल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता . पत्रकार परिषद घेऊन याला उत्तर देताना चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले कि , आपला साखर कारखाना कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असून लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे .
चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, मनी लॉन्ड्रिंगचा धंदा असेल तर त्यांची चौकशी करू द्या चन्नराज हट्टीहोळी यांनी आणखी एक आरोप केला आहे. सौभाग्य लक्ष्मी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी शेकडो कोटींचे कर्ज घेतले आहे. पण प्रत्यक्षात इथेनॉल प्लांट नाही सीडी प्रकरणाचा तपास सीबीआय ने करावा अशी मागणी रमेश जारकीहोळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांमार्फत सीबीआयकडे करीत आहेत . या घटनेला दोन वर्षे झाली आहेत. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रमेश जारकीहोळी यांनीही कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी सीबीआय तपासाचा आग्रह धरायला हवा होता. तेव्हा आपल्याच सरकारमध्ये चौकशी झाली पाहिजे, अशा मनस्थितीत ते होते. राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून तपास केला.
गोकाक काँग्रेसच्या तिकिटासाठी पंचमसाली उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे . असे अशोक पुजारी यांनी सांगितले .पंचमसाली समाजाचा लढा हा राजकीय लढा नाही. त्या वंशातील शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. वीरशैव लिंगायत समाजाचा पंचमसाली संघर्षाला पाठिंबा आहे. आमदारांना पाठिंबा देण्यासाठी हा लढा नाही.
रमेश जारकीहोळी यांचे षडयंत्राविषयीचे विधान ते ऑडिओ संपादित करून रिलीज पर्यंत सांगून त्यानं कित्तूर राणी चन्नमा यांच्याविषयी रासेश् जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा करण्याची मागणी अशोक पुजारी यांनी केली . सीबीआयच्या तपासाची मागणी करून, ते आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे, असे अशोक पुजारी म्हणाले .


Recent Comments