कुमारस्वामींचे मानसिक संतुलन ढळलेय अशा शब्दांत आ. अरविंद बेल्लद यांनी, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे महा मुत्सद्दी राजकारणी एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आहेत. त्यांचे डोके ठिकाणावर नाही, त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे असे सांगत त्यांनी एचडीकेना फटकारले.
हुबळीत प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अरविंद बेल्लद म्हणाले की, निवडणुकीच्या आधीच लोक त्यांच्या पक्षापासून दूर पळत आहेत. त्यांचेच नेते त्यांच्या विरोधात उठले आहेत. काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना कळत नाही, त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारमध्ये जात-पात न पाहता सगळ्यांना स्थान दिले आहे. किरकोळ आणि जातीचे राजकारण करणे गौडा कुटुंबाला शोभत नाही, कुमारस्वामी यांच्या विधानाने देवेगौडा आणि रेवण्णा यांसह संपूर्ण कुटुंबाला कलंकित केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा त्यांच्या कुटुंबिय आणि पक्षदेखील निषेध करेल. ते लोकांमधील एकोपा बिघडवण्याचे काम करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments