बेळगाव येथील हंजी कॅन्सर हॉस्पिटल येथे महांतेश नगरच्या ब्रह्मकुमारी वैद्यकीय शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय कर्करोग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
व्हॉइस ओव्हर : शेख होमिओपॅथी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ब्रह्मा कुमारी डॉ. संगीता बेळगावमठ याची राजयोगाने मन आणि शरीर कसे निरोगी ठेवता येते हे सांगितले. विचारांचा शरीरावर कसा परिणाम होतो. तर आनंदाने आपल्या पचनसंस्थेच्या संबंधात, शांती आपल्या श्वसनसंस्थेशी संबंधित आहे याबद्दल उपस्थितांना सांगितले .
बी. के. रूपा यांनी संस्थेचा परिचय करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते झाडांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. हंजी यांनी स्वागत केले.
के. एल. इ. च्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मुक्ता, महिलांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता किती आहे? खबरदारीचा उपाय म्हणून काय करायला हवे ते सांगितले.
स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष द्या . आणि शरीरात स्वतःचे बदल दिसून येतात. ते जाणून घ्या आणि तातडीने उपचार करा, असे डॉ अभिनंदन हंजी यांनी सांगितले.
बी. के. अनिता यांनी ध्यानधारणा केली.कर्करोगग्रस्तांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका लोखंडे यांनी केले. यावेळी बीके श्रीकांत तसेच रुग्णालयातील कर्मचारी व अनेक रुग्ण सहभागी झाले होते.


Recent Comments