द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मनोहर आयतवाड, वय ५५ असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी द्राक्ष बागेमध्येच विष प्राशन करून जीवन संपवले.
विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बाबानगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मनोहर आयतवाड या शेतकऱ्याने द्राक्ष पिकावर चुकीच्या औषधाची फवारणी केली होती. चुकीच्या औषधामुळे काढणीला आलेली द्राक्षे सुकली होती.
द्राक्ष पिकासाठी त्यांनी पाच लाखांचा खर्च केला होता. परंतु चुकीच्या औषधाची फवारणी केल्याने त्यांचे सर्व द्राक्ष पीक सुकून गेले होते. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. पिकाचा उत्पादन खर्चही भागवता येत नसल्यामुळे निराश झालेल्या मनोहर यांनी द्राक्ष बागेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तिकोटा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडली.


Recent Comments