Belagavi

विमल फाउंडेशन आयोजित चित्रकला स्पर्धा अचानक रद्द

Share

विमल फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा अचानक रद्द करण्यात आल्या आहेत . दरम्यान या स्पर्धा रद्द करविण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आयोजक किरण जाधव यांनी केला आहे .

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले कि , विमल फाउंडेशनकड्न , बेळगाव उत्तर आणि दक्षिण भागामध्ये , महापालिकेच्या व्याप्तीतील एकूण 78 शाळांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता . गेल्या आठवडाभरपासून , आम्ही या स्पर्धेची तयारी करीत होतो . अचानक बीईओ ऑफिसकडून आदेश आला कि तुम्हाला शाळांमध्ये स्पर्धा घेता येणार नाही , स्पर्धा घेतली तर कारवाई करण्यात येईल . त्यामुळे शाळा प्रशासन मंडळांनी घाबरून जाऊन या स्पर्धा रद्द केल्याचे सांगितले .

यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले . याबाबतीत बीईओ ना स्पष्ट जाब विचारणार आहोत .मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा , त्यांना प्रोत्साहन मिळावे या एकाच हेतूने आयोजित केलेली ही स्पर्धा रद्द केल्याने , मुलांचे नुकसान केले आहे . सर्व शाळा प्रशासनाला विश्वासात घेऊन ही स्पर्धा आयोजित केली होती . जवळपास दीड लाख मुलांनी या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली होती . मात्र अचानक बीईओ नी आदेश काढल्याने ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे .

बेळगावातील सुज्ञ जनता , पालक आणि विद्यार्थ्यांना यामागे कोण आहे ते नक्कीच असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Tags: