Belagavi

ऐकण्याची, समजून घेण्याची नम्रता शिक्षकामध्ये असली पाहिजे : स्वामी नित्यस्थानंदजी

Share

शिक्षकामध्ये इतरांकडून ऐकण्याची आणि शिकण्याची नम्रता असली पाहिजे. अनुभवातून शिकण्याची आणि मुलांमध्ये विचारशक्ती विकसित करण्याची मानसिकता असली पाहिजे असे बेंगळुरच्या रामकृष्ण मिशन आश्रमाचे अध्यक्ष स्वामी नित्यस्थानंदजी यांनी सांगितले.

बेळगावातील किल्ला परिसरातील रामकृष्ण मिशन आश्रमाच्या श्री विश्वभावैक्य मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात “आदर्श शिक्षक कोण” या विषयावर ते व्याख्यान देत होते. यावेळी त्यांनी ज्ञानाची तहान जागृत करणारा आदर्श शिक्षक कोण या विषयावर भाष्य केले. मुले प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुंदर वाढ करण्याची शक्ती असते. ते बाहेर काढण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे त्यांनी सांगितले.

संसाधन व्यक्ती म्हणून आलेले सुरेश कुलकर्णी म्हणाले की, शिक्षकांनी सर्जनशील कलांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन व शिक्षण द्यावे. शिक्षकांना रोज नवनवीन गोष्टी शिकवता आल्या पाहिजेत आणि शिक्षक देखील शांती आणि सहिष्णुतेच्या माता आहेत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करणे, त्याला
आकार देण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे असे ते म्हणाले.

यावेळी विविध विद्यालयांचे शिक्षक आणि विध्यार्थी उपस्थित होते.

Tags: