Belagavi

आ. अभय पाटील यांच्या पुढाकाराने १२ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

Share

आ. अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगाव दक्षिण मतदारसंघातील २९ ठिकाणी १२ कोटींच्या विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला आहे.

शहर आणि परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांची त्वरित सोडवणूक करण्यासाठी आता विकास कामांना चालना देण्यात आली आहे. बेळगाव दक्षिण विभागातील विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. आ. अभय पाटील यांनी या विकासकामांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला.

यापूर्वी ‘नाश्ते पे चर्चा’ या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी काही कामांची मागणी केली होती. त्याची दखल घेवून ही कामे सुरू केली आहेत. सुमारे १२ कोटी रुपये निधीतून ही कामे करण्यात येत आहेत. ही कामे येत्या ३० ते ४० दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले. यामध्ये महाद्वार रोड, गेंजीमळा, कपिलेश्वर कॉलनी येथील नवीन आरसीसी ड्रेनेज पाईपलाईन आणि गटार निर्मितीची कामे सुरू करण्यात आली आहेत.

शास्त्रीनगरमधील विविध विभागात रस्ते सुधारणा कामे सुरू झाली आहेत. शहापूरमधील आचार्य गल्ली येथे पेव्हर्स बसविणे, ओमनगर येथील रस्त्याची सुधारणा, टीचर्स कॉलनी येथील रस्त्यांची सुधारणा करण्याची कामे देखील सुरू झाली आहेत. खासबाग येथील कन्नड शाळा क्रमांक ३ मध्ये दुरूस्ती काम हाती घेण्यात आले आहे. खासबाग, वडगाव, देवांगनगर येथील कामांचा प्रारंभही करण्यात आला.

Tags: