Belagavi

काशी यात्रेसाठी खास रेल्वे; चारधाम, मानसरोवर यात्रेसाठीही प्रयत्न : शशिकला जोल्ले

Share

काशी यात्रेला जाण्यासाठी खास रेल्वे सुरू करण्यात आली असून, आजपर्यंत ३ वेळा भाविकांना काशीयात्रेचा लाभ मिळवून दिला आहे. २० हजार रुपयांचे हे पॅकेज असून त्यापैकी ५ हजार रुपये धर्मादाय खात्यातर्फे देण्यात येतात. लवकरच चौथी काशी यात्रा निघणार आहे. तसेच चारधाम आणि मानसरोवर यात्रेसाठीसुद्धा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, हज आणि काशी यात्रेला जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. या अंतर्गत ३ हजार जणांना हजला पाठविण्यात आले आहे तर काशी यात्रेअंतर्गत ८ दिवसांचा प्रवास असून काशी, अयोध्या आणि प्रयाग या ठिकाणी भाविकांना नेले जाते. काशीमध्ये कर्नाटक भवन आहे. सेवा सिंधू ऍपमधून अर्ज केल्यास अन्य वाहनांनी गेल्यावरही मर्यादित स्वरुपात अर्थसाहाय्य देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

चारधाम यात्रा व मानसरोवर या स्थळांना जाण्यासाठीसुद्धा लवकरच सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, आपल्या संस्कृतीमध्ये काशीयात्रा आणि गंगास्नान यांना विशेष महत्त्व असल्यामुळे सर्वप्रथम काशी यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

धर्मादाय खात्याच्यावतीने राज्यातील धर्मादाय व वक्फ बोर्डाच्या जागांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. याचा तपशील लवकरच उपलब्ध होईल. त्यानंतर या जागांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जोल्ले यांनी दिली. धर्मादाय खात्यात अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याची जाणिव आपल्याला आहे. मात्र, लवकरच रिक्तपदांवर नेमणुका केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट
यावेळी धर्मादाय खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: