Belagavi

कित्तूर चन्नम्मा यांचा 194 वा जन्म स्मरणोत्सव : बेळगावात महाज्योतीचे भव्य स्वागत

Share

आजच्या तरुणांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार न करता आपल्या देशाच्या वीरांचे शौर्य, आदर्श आणि संदेश आपल्या जीवनात अंगीकारून जगले पाहिजे असे लिंगायत नेते सिद्धनगौडर यांनी सांगितले.

राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या 194 व्या जयंती स्मरणोत्सवाचा एक भाग म्हणून त्यांचे जन्मगाव बेळगाव तालुक्यातील काकती येथून आज बेळगावात महाज्योत यात्रा काढण्यात आली. शहरातील चन्नम्मा चौकात चन्नम्मा महाज्योत यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.

यावेळी माहिती देताना सिद्धनगौडर म्हणाले, चन्नम्मा चौकात स्वागत केल्यानंतर राणी चन्नम्मा महाज्योत त्यानंतर ते कित्तूर किल्ला, थोर स्वातंत्र्यसैनिक आमटूर बाळप्पा यांचे स्मारक आणि संगोळ्ळी येथील संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी नेण्यात येणार आहे. त्यानंतर बैलहोंगल येथील चन्नम्मा यांच्या समाधीस्थळी ज्योत नेऊन अभिवादन करण्यात येणार आहे.

यावेळी माजी तालुका पंचायत अध्यक्षा रोहिणी बाबासाहेब पाटील, महादेवी कोटगी, ईश्वरी, चन्नम्मा, द्राक्षायणी आदी उपस्थित होते.

Tags: