Vijayapura

‘टिपू निज कनसू’ नाटकाविरोधातील खटला मागे

Share

‘टिपू निज कनसू’ (टिपूचे खरे स्वप्न) या कन्नड नाटकाविरोधात दाखल केलेला खटला मागे घेण्यात आला आहे याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया विजापूर येथील रंगायणचे दिग्दर्शक अड्यांड कार्यप्पा यांनी व्यक्त केली आहे.

हा आमच्या अखंड संघर्षाचा विजय आहे, मी याचा आनंद साजरा करेन, असे ते म्हणाले. खटल्याच्या सुरूवातीला आम्हाला अडथळे आले, न्यायालयाने आमची बाजू न ऐकता एकतर्फी स्थगिती आदेश दिला. परंतु आम्ही अनेक कागदपत्रे सादर केली आणि आमच्या वकिलांनी सक्षमपणे युक्तिवाद केला. नाटक सत्याने भरलेले आहे, यात काहीही खोटे दाखवले नाही. आमच्याकडे साक्षी-पुरावे असल्याने स्थगिती आदेश उठवण्यात आला.

काल बंगळुर न्यायालयात खटला सुनावणीसाठी आला तेव्हा याचिकाकर्ते रफिउल्ला यांनी हा संपूर्ण खटला मागे घेतला. आम्ही साक्षीदारांना हजर करण्यासाठी गेलो असून यापूर्वी तीन सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या आदेशात, टिपू हा स्वातंत्र्यसैनिक नव्हता असे म्हटले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने या सगळ्याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले. टिपूच्या नावं दिलेले सर्कल आणि टिपू गार्डनचे नामांतर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Tags: