Vijayapura

नागठाण मतदारसंघात घडामोडी वाढल्या; सीपीआय महेंद्र नाईक यांचा राजीनामा

Share

विजापूर जिल्ह्यातील नागठाण मतदारसंघात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशा राजकीय घडामोडीत वेग आला आहे. निवडणूक लढविण्याच्या इराद्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हेतूने बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सीपीआय पदाचा राजीनामा दिलाय.

विजापूर जिल्ह्यातील नागठाण राखीव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले पोलीस अधिकारी महेंद्र नाईक यांनी राजीनामा दिला असून कौटुंबिक अडचणींमुळे राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. नाईक सध्या बागलकोटमध्ये लोकायुक्त सीपीआय म्हणून कार्यरत आहेत.

मंत्री गोविंद कारजोळ यांचे पुत्र गोपाल कारजोळ सुद्धा याच ठिकाणी इछुन आहे. त्यांची महत्त्वाकांक्षा असलेल्या नागठाण मतदारसंघावर पोलिस अधिकारी नाईक यांची नजर आहे. जेडीएसचे आमदार देवानंद चव्हाण सध्या येथील प्रतिनिधीत्व करत आहेत. महेंद्र नाईक यांच्या राजीनाम्यानंतर विजापूर जिल्ह्यातील नागठाण मतदारसंघात राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

Tags: