आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासकामांना भूमिपुजन करून चालना देण्यात आली.

आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते खानापूर तालुक्यातील विविध गावातील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. भालकी खुर्द गावात 20 लाख रुपये खर्चाच्या सीसी रोडचे बांधकाम, मोहिशेत गावात सुमारे 20 लाख खर्चाच्या पुलाचे बांधकाम, त्याचप्रमाणे लोंढा गावात सुमारे 20 लाख निधीतून बस स्थानकाजवळ रस्ता बांधकाम, अक्राळी गावातील रस्ते बांधणी, तारवडा, घार्ली गावात विकास कामांचा शुभारंभ पूजाअर्चा करून करण्यात आला. एकूणच आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.



Recent Comments