Belagavi

कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास घ्यावेत त्वरीत उपचार

Share

कुष्ठरोग हा लेप्री नावाच्या सूक्ष्म जिवाणूमुळे पसरणारा आजार आहे.सर्वसामान्य जनतेने व विशेषत: तरुणांना कुष्ठरोगाबद्दल जागरुक केले पाहिजे आणि कुष्ठरोग झाल्याचे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जावे. असे डॉ.चांदनी देवडी म्हणाल्या . ,

राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि कुष्ठरोग नियंत्रण विभाग आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बेळगाव, ग्रामपंचायत हिंडलगा, कुष्ठरोग मिशन हॉस्पिटल हिंडलगा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बेळगुंदी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाव्यापी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

शहरातील जिल्हा कुष्ठरोग रुग्णालयाच्या मिशन नियंत्रण विभागाच्या प्रांगणात कुष्ठरोग जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

डॉ.चांदिनी देवडी यांनी बोलतांना सांगितले की, कुष्ठरोगाबाबत जनजागृती करणे, कुष्ठरोगाबाबत होत असलेल्या भेदभावाबद्दल आणि मानसिक आरोग्याबाबत सखोल समुपदेशन करणे आपण सर्वांनी गरजेचे आहे.

समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. सुरेश वर्गीस यांनी सांगितले की, कुष्ठरोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध घेऊन उपचार केल्यास अपंगत्व टाळता येते.


कुष्ठरोगामुळे होणाऱ्या अपंगत्वामुळे थेट बाधित झालेल्या लोकांना योग्य ती माहिती देण्यात यावी. कुष्ठरुग्णांमध्ये भेदभाव न करता योग्य पध्दतीने बरे करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न केला पाहिजे.

कार्यक्रमाला शाळकरी मुले, अंगणवाडी आशा सेविका व इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: