Belagavi

बेळगावच्या राज्योत्सवासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात करावी भरीव तरतूद

Share

बेळगावमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या राज्योत्सवासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी भरीव निधीची तरतुद कारवाई तसेच , उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांच्या विकासासाठी विशेष प्राधान्य द्यावे अशी मागणी करवेच्या पदाधिकाऱ्यांनी केली .

आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी , करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी सांगितले कि , बेळगाव शहरात साजरा होणाऱ्या राज्योत्सव सोहळ्यासाठी दरवर्षी विशेष अनुदानाचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून मिरवणुकीत कालावधीत वाढ करावी . त्याचप्रमाणे बेळगाव विमानतळावरून रद्द करण्यात आलेली विमान उड्डाणे पुन्हा सुरु करावीत, यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जावे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग निर्मिती करावी तसेच बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित करावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली .

तसेच करवेचे महादेव कोलकर यांनी सांगितले कि, उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे . मुख्यमंत्री देखील उत्तर कर्नाटकचे सुपुत्र आहेत . त्यामुळे उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येकी 500 कोटी. रु.चे विशेष अनुदान द्यावे , तशी घोषणा बजेटमध्ये करावी , समग्र भाषा विदेयक अमलात आणावे , त्याचप्रमाणे बेळगाव सीमाभागातील शाळांच्या विकासासाठी विशेष अनुदान द्यावे , सरकारने महिलांच्या उच्च शिक्षणासाठी शून्य व्याजदराने कर्ज देण्याची योजना अर्थसंकल्पात जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली .

तत्पूर्वी शहरातील कन्नड साहित्य भवनापासून, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला . चन्नमा सर्कलमध्ये करवे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली . व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या मागणीचे निवेदन सादर केले .

सुरेश गवन्नावर , गणेश रोकडे, रमेश यरगण्णवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: