Belagavi

मडीवाळ माचीदेव यांचे समाजासाठीचे योगदान अविस्मरणीय : आमदार अनिल बेनके

Share

श्री मडीवाळ माचीदेव हे शिवशरणांच्या वचनांच्या संग्रहाची संस्कृती प्राचीन काळापासून प्रत्येक घराघरात शिस्तबद्ध पद्धतीने पोहोचवण्याचे काम करत होते. ही संस्कृती आज आपण सर्वांनी जपली पाहिजे, जोपासली पाहिजे.असे बेळगाव उत्तरचे आ . अनिल बेनके म्हणाले .

बेळगाव शहरातील कुमार गंधर्व कला भवनामध्ये, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती विभाग आणि महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री मडीवाळ माचीदेव जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. श्री मडीवाळ माचीदेव हे शिवशरणांच्या वचनांच्या संग्रहाची संस्कृती प्राचीन काळापासून प्रत्येक घराघरात शिस्तबद्ध पद्धतीने पोहोचवण्याचे काम करत होते. ही संस्कृती आज आपण सर्वांनी जपली पाहिजे . मडीवाळ माचीदेव यांचे समाजासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे असे आ . अनिल बेनके म्हणाले .

या कार्यक्रमाला , अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांच्यासह समाजाचे नेते उपस्थित होते.

Tags: