Vijayapura

शिवाजी महाराजांचा अपमानाबद्दल एकावर गुन्हा

Share

समाज माध्यमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील एका अल्पवयीन मुलाविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजी महाराजांबद्दल अर्वाच्य मजकूर लिहून तो व्हॉट्सअपवर टाकण्यात आला होता. त्या विरोधात क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अंबादास सिंदगी यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून संबंधित मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चडचण पोलिस ठाण्यात कलम १५३अ, २९५अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: