Belagavi

देवगिरीत जोमलिंग व लक्ष्मी गल्लीत रस्ता कामाला चालना

Share

बेळगाव तालुक्यातील देवगिरी गावच्या जोमलिंग गल्ली व लक्ष्मी गल्ली, दोन्ही मिळून १९५ मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला यमकनमर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार सतिश जारकिहोळी यांच्या उपस्थीतीत प्रारंभ करण्यात आला.

मंजूर झालेल्या १५ लाख रुपये फंडातुन रस्त्याच्या कामाला आमदार सतिश जारकिहोळी यांच्या उपस्थीतीत ग्रा. पं. अध्यक्षा रेखा सुतार, माजी ग्रा.पं.अध्यक्षा श्रीदेवि पाटील, सदस्या मंजुळा अंकी, सदस्य गौडाप्पा पाटील, भरमा कुंभरगी, बाबु बडिगेर व माजी सदस्या शांतव्वा पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवुन, कुदळ मारून विधिवत पूजा करुन रस्त्याचे भमिपुजन करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थ व विविध संघ-संस्थांकडुन आमदार जारकिहोळींचे स्वागत करण्यात आले. नंतर त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन सर्व समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.


यावेळी माजी जि.पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, माजी ग्रा.पं. अध्यक्ष अण्णु कटांबळे, केपिसिसि सदस्य मलगौडा पाटील, जारकिहोळी यांचे आप्त सचिव पांडूअण्णा रणसुभे, माजी ता.पं. सदस्य मारुती सनदी, माजी पिकेपिएस संघाचे अध्यक्ष जोमा अंबेवाडी, रामचंद्र बडिगेर, एसडीएमसी अध्यक्ष श्रीशैल संपगावि, राजु सुतार, निंगाप्पा अंकी, वजीर पाटील, शिवा देसाई, जयराम बुरलीसह विविध संघसंस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: