Belagavi

दोघा गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश

Share

मटका, जुगार, अवैध दारूविक्री प्रकरणांत सहभागी असलेल्या दोघा गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी बजावला आहे.

मटका, जुगार, अवैध दारूविक्री अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी कडक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. वारंवार सूचना, ताकीद देऊनही न सुधारणाऱ्या गुन्हगारांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशा गुन्ह्यांत गुंतलेल्या दोघांना तडीपार करण्याचा आदेश शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी बजावला आहे. लक्ष्मण उर्फ बाळू सातेरी पाटील, रा. बादरवाडी आणि नागप्पा शांतप्पा पागरायी, रा. हुदली, दोघेही ता.

बेळगाव यांच्यावर हद्दपारीचा आदेश बजावला आहे. हद्दपारीच्या काळात या दोघांनी बेळगाव जिल्ह्याबाहेर अनुक्रमे कोप्पळ आणि बळ्ळारी येथे राहण्याचा आदेश बजावला आहे. बेळगाव ग्रामीण आणि मारिहाळ पोलिसांच्या अहवालावरून कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी यांच्या शिफारशीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags: