राज्य सरकारने बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
गृह मंत्रालयाने या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. रवींद्र गडादी यांच्या जागी एच. शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र गडादी यांची डीसीपी कमांड सेंटर बेंगळुरू येथे बदली करण्यात आली आहे.
एसीपी नारायण बरमणी यांची बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद उपविभागात आणि ग्रामीण एसीपी एस. व्ही. गिरीश यांची हुबळी-धारवाड सीसीबीमध्ये बदली करण्यात आली आहे


Recent Comments