Dharwad

जलमंडळाच्या कर्मचाऱ्यांचे धारवाड महापालिकेसमोर बेमुदत उपोषण

Share

थकबाकी देऊन , त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी जलमंडळाच्या तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून धारवाड महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

जनजागृती संघाचे अध्यक्ष बसवराज कोरव यांच्या नेतृत्वाखाली तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या हौतात्म्य दिनी महापालिकेविरोधात उपोषण सुरु केले आहे.आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी घोषणाबाजी केली .

जलमंडळाच्या कर्मचाऱ्यांना सात महिन्यांची थकबाकी द्यावी, याप्रकरणी महापौर इरेशा अंचटगेरी भेदभाव करत आहेत. यासंदर्भात बैठक घेऊन वेतन दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, 15 दिवस उलटून गेले तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. इरेशा अंचटगेरी आणि या भागातील आमदार एल अँड टी च्या एजंटप्रमाणे वागत असल्याचा आरोप जनजागृती संघाचे अध्यक्ष बसवराज कोरव यांनी केला.

300 हून अधिक कर्मचाऱ्यांचा जीव आता धोक्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे कामाअभावी हाल होत आहेत. त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची मागणी ते करीत आहेत . सध्या ते आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषणाला बसले असून, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी महापौर इरेशा अंचटगेरी आणि महापालिका आयुक्तांची असेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे .

Tags: