Belagavi

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पानी पाहिला मन कि बात कार्यक्रम

Share

२०२३ या नवीन वर्षातील मन कि बातचा पहिला भाग , कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यासह भाजप नेत्यांनी मिळून बेळगावमध्ये पहिला .

बेळगावमध्ये , आयोजित केलेल्या , रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीआधी , माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यासहित अनेक भाजप नेते तसेच रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीसाठी विविध राज्यातून आलेले रयत मोर्चाचे पदाधिकारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मन कि बात या कार्यक्रमाचा ९७ वा भाग पाहिला .

या मन कि बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी , तृणधान्याचे महत्व सांगितले . ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी चांगली असल्याचे मोदी यावेळी म्हणाले . पंतप्रधान मोदी यांनी पदम पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले .

यावेळी खा .मंगला अंगडी , राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी , राजकुमार चहर , एन रवीकुमार तसेच आमदार आणि विविध राज्यातून आलेले रयत मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते .

Tags: