मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेरजवळ हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या अपघातात शहीद झालेले पायलट, गणेशपूर, बेळगावचे विंग कमांडर हनुमंतराव रेवणसिद्धप्पा सारथी यांचे पार्थिव बेळगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
रविवारी (29 जानेवारी) दुपारी 12.30 वाजता लष्कराच्या विशेष विमानाने या जवानाचा मृतदेह सांबरा विमानतळावर आणण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
बेळगावचे विंग कमांडर हनुमंतराव सारथी यांचे ग्वाल्हेर येथे प्रशिक्षण मोहिमेदरम्यान लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाल्याची बातमी कळताच अत्यंत दु:ख झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शोक व्यक्त केला.

अभिमानी योद्धा हनुमंतराव यांचे निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मीही सहभागी आहे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो” असे आपल्या शोकसंदेशात जिल्हाधिकारी पाटील यांनी म्हटले आहे. सांबरा विमानतळावर मान्यवरांनी विंग कमांडर सारथी यांचा पार्थिव देह त्यांच्या गणेशपूर, बेळगाव येथील निवासस्थानी रवाना करण्यात आला.


Recent Comments