Belagavi

रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य मिरवणूक

Share

बेळगावात होणाऱ्या रयत मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली .

शहरात दोन दिवस भाजप रयत मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली आहे . या निमित्ताने शहरातील किल्ला तलावाजवळील , दुर्गा देवी मंदिराला माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दुर्गादेवी मंदिराला भेट दिली आणि देवीचे दर्शन घेतले .

यावेळी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी देखील दुर्गा देवीचे दर्शन घेतले .

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या रयत मोर्चाच्या मिरवणुकीची सुरुवात केली . त्यानंतर सजवलेल्या बैलगाडीवर येडियुरप्पा हिरवी शाल घालून स्वार झाले. यावेळी त्यांच्या सोबत
रयत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर, प्रदेश सरचिटणीस एन. रविकुमार.
रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आदी त्यांच्या सोबत होते .

यावेळी धनगरी ढोलाच्या तालावर ही मिरवणूक मयुर प्रेसिडेन्सी क्लबच्या दिशेने पुढे सरकत होती . या मिरवणुकीत देशातील विविध राज्यातुन रयत मोर्चाचे पदाधिकारी सहभागी झाले होते .

ढोल ताशांच्या गजरात रयत मोर्चाची ही मिरवणुक कार्यक्रमस्थळी नेण्यात आली .

Tags: