बेळगाव तालुक्यातील प्रस्तावित रिंग रोडच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट निवेदन सादर केले.
कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या बाबतीत सविस्तर माहिती दिली. रिंग रोड प्रकल्पामुळे शेकडो शेतकऱ्यांची सुपीक जमीन गेल्याने ते देशोधडीस लागणार आहेत. त्यामुळे रिंग रोड ऐवजी फ्लायओव्हर रोड करावा असा पर्याय यावेळी देण्यात आला. निवेदनासोबतच शेतीचे, पिकांचे फोटो आणि सीडी देण्यात आले. रिंग रोडच्या विरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी नितीन गडकरी यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला.

निवेदन देतेवेळी समितीचे शिष्टमंडळात प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, एड. एम. जी. पाटील, विकास कलघटगी, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, कृष्णा हुंदरे, आर. आय. पाटील, पुंडलिक पावशे, दत्ता उघाडे आदींचा समावेश होता.


Recent Comments